‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील रांगोळीमुळे लोकांमध्ये परिवर्तन होऊन त्यांनी गणेशोत्सवातील चुकीच्या गोष्टी बंद करणे

१. गणेशोत्सवात लोक गुलाल आणि चुरमुरे टाकत असल्याचे लक्षात येणे अन् ‘हे चुकीचे आहे’, असे सांगूनही त्यांनी ते न ऐकणे : ‘एका वर्षी कारखाना कॉलनीमध्ये गणपति बसवला होता. त्या वेळी तेथील लोक गुलाल आणि चुरमुरे टाकत होते. तेव्हा आम्ही साधकांनी तेथील लोकांना सांगितले, ‘‘असे करणे चुकीचे आहे. ‘धर्माचरण करणे म्हणजे खरी पूजा आहे’, असे सांगितले’’; परंतु त्यांनी ऐकले नाही.

२. सनातनच्या ‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील गणेशतत्त्वाची रांगोळी काढल्यावर लोकांनी रांगोळीचे कौतुक करणे आणि गुलाल अन् चुरमुरे टाकणे बंद करणे : त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सनातनच्या ‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील गणेशतत्त्वाची रांगोळी काढली आणि निघालो. नंतर दुसर्‍या दिवशी तेथे गेलो. तेव्हा ते लोक आमची वाट बघत बसले होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही चांगली रांगोळी काढली.’’ रांगोळीमुळे त्यांच्या मनात पालट झाला. ते लोक म्हणाले, ‘‘आम्ही गुलाल आणि चुरमुरे टाकणार नाही’’ आणि त्यांनी तसे काही केलेही नाही.’

– सौ. संगीता बाळासाहेब देशमुख, भाळवणी, अकलूज, जिल्हा सोलापूर. (२४.११.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक