दादर येथे चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या आवाहनाला अनुयायांनी हरताळ फासला !

दादर येथे चैत्यभूमीवर गर्दी

मुंबई – कोरोनाच्या संसर्गामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी करू नये’, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते; मात्र काही लोकांनी तेथे गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. कोरोना प्रतिबंधक नियमांचेही येथे शासनकर्ते आणि त्यांचे अन्य कार्यकर्ते यांच्याकडून उल्लंघन झाले होते. ‘राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रांगेत उभे न रहाता थेट येऊन अभिवादन करत आहेत, मग सर्वसामान्यांनी रांगा का लावायच्या ?’, असा प्रश्न काही तरुणांनी उपस्थित केला. या वेळी सरकारकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आली नसल्याचा आरोप करत त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स खाली पाडून आत जाण्याचा प्रयत्न केला.