१. ‘तह’ म्हणजे काय ?, तर ‘पुढील युद्धासाठी अधिकाधिक सिद्धता कशी काय करता येईल ?’, याचा शांतपणे विचार करता यावा; म्हणून चालू युद्ध स्थगित करण्याचा केलेला करार.
२. ‘फितूर’ म्हणजे काय ? तर एखादा माणूस आपल्या पक्षातून दुसर्या पक्षात जाणे आणि ‘मतपरिवर्तन’ म्हणजे दुसर्या पक्षातला माणूस आपल्या पक्षात येणे !
३. वर्गणी म्हणजे प्रतिष्ठित भिक्षा होय !
४. ‘वकील’ अधिक संख्येने असले, तर ‘केस’ उशिरा आटोपते आणि ‘डॉक्टर’ अधिक असले, तर ‘केस’ लवकर आटोपते.
५. ‘माझे ते खरे’, ही प्रवृत्ती नसावी, तर ‘खरे ते माझे’ ही प्रवृत्ती असावी.
६. जगात दोन प्रकारची माणसे असतात, एक ‘सांगकामे’ आणि दुसरे ‘कामसांगे’ !
७. ‘प्रपंचात नेहमी खाली पहावे आणि परमार्थात नेहमी वर पहावे.’ – श्री अंबुराव महाराज
८. ‘मलयालम’ हा शब्द उलटा वाचला, तर तोच रहातो आणि आश्चर्य अन् गंमत म्हणजे हा शब्द इंग्रजीत उलट-सुलट लिहिला, तरी तसाच रहातो Malayalam.’
– सु.ह. जोशी (‘मासिक प्रसाद’, दीपावली २००२)