‘परीक्षेचा निकाल म्हणजे जीवनाचा अंतिम निकाल नसतो. तुम्ही मन लावून शिकता, तरीही योग्य निकाल लागला नाही, तर निराश होऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. बघा, एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल. काही लोक परीक्षेचा निकाल मनासारखा न लागल्यावर आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलतात. परीक्षेचा निकाल जीवनापेक्षा मोठा नाही आणि यश अन् अपयश हे जीवनाचे अंग आहे.’
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)