इतर संतांचे मार्गदर्शन तात्त्विक असणे, तर सनातनच्या संतांचे मार्गदर्शन कार्यकारणभाव आणि उपाय सांगणारे असणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘समाजामध्ये अध्यात्माविषयी बोलणारे अनेक जण असतात. अनेक संत अध्यात्माच्या उच्च पातळीला पोचलेले असतात;  परंतु इतरांना मार्गदर्शक करतांना ते बहुतांश तात्त्विक भागच सांगतात, उदा. ‘अहंचा त्याग केला की, संसारातील लाभ-हानी सहजतेने स्वीकारता येते.’ यामध्ये समाजाला ‘अहंचा त्याग करण्यासाठी नेमके काय करावे ?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

याउलट सनातनच्या संतांचे लिखाण आणि मार्गदर्शन साधनेच्या स्तरावर नेमकेपणाने कोणती कृती का आणि कशी करावी, हे स्पष्ट करणारे असते. ते कार्यकारणभावासह उपाय सांगणारे असते. यामुळेच आज सनातन संस्थेतील साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)