दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि समाजातील एक प्रसिद्ध दैनिक यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारे संशोधन !

नियतकालिकांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

‘आजच्या स्पर्धात्मक युगात समाजातील बहुतांश दैनिके निव्वळ व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन कार्यरत आहेत. दैनिकांशी संबंधित काम करणारे कर्मचारी केवळ उदरभरणासाठी तेथे चाकरी करतात. याउलट दैनिक ‘सनातन प्रभात’चा उद्देश ‘राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती’ हा आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे सर्वजण साधक आहेत. ते दैनिकाशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांची साधना म्हणून करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभीपासूनच साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्यास शिकवले. आजही ते साधकांना याविषयी तळमळीने मार्गदर्शन करत आहेत. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणार्‍या साधकांची साधना वृद्धींगत होऊन त्यांची साधनेत जलद प्रगती व्हावी, या तळमळीपोटी २०.५.२०२१ पासून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना त्यांच्याकडून होणार्‍या व्याकरण आणि संकलन यांच्या स्तरांवरील लहान-मोठ्या चुका कळवण्यास आरंभ केला. गेले काही ४ मास साधकांनी तळमळीने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्याकडून होणार्‍या चुकांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले. याचा सकारात्मक परिणाम दैनिक ‘सनातन प्रभात’वर झाल्याचे दिसून आले. समाजातील दैनिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारे संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

जून २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी चुका सुधारण्याची प्रक्रिया चालू केली. ऑक्टोबर २०२१ पासून दैनिकातील चुका पुष्कळ अल्प झाल्या. या चाचणीत २.१०.२०२१ या दिवशीचा चुका नसलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक (टीप) आणि त्याच दिवशीचे समाजातील एक प्रसिद्ध  दैनिक यांची ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

टीप – दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २.१०.२०२१ या दिवशीच्या अंकामधील एकही चूक परात्पर गुरु डॉक्टरांनी कळवली नाही.

१ अ. चुका नसलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा असणे : समाजातील प्रसिद्ध दैनिकामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळून आल्या. चुका नसलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२. निष्कर्ष

२ अ. समाजातील एका प्रसिद्ध दैनिकामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : दैनिकाची सात्त्विकता त्या दैनिकाचा उद्देश, त्यातील वृत्तांचे टंकलेखन, संकलन अन् मुद्रितशोधन, विज्ञापनांची संरचना इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. हे घटक जितके सात्त्विक किंवा असात्त्विक तेवढी त्या दैनिकातून सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. समाजातील प्रसिद्ध दैनिकामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे दैनिक वाचतांना त्यातून प्रक्षेपित होणार्‍या नकारात्मक स्पंदनांचा परिणाम वाचकांवर होऊन त्यांची आध्यात्मिकदृष्ट्या हानी होते.

सौ. मधुरा कर्वे

२ आ. चुका नसलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे ध्येय हे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे आहे. दैनिकातून राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भातील मार्गदर्शक लेख प्रसिद्ध केले जातात. ‘समाजाला काय आवडते ? याऐवजी समाजासाठी काय आवश्यक आहे’, याचा विचार केला जातो. दैनिक ‘सनातन प्रभात’ भाषाशुद्धीला महत्त्व देते; कारण भाषा जेवढी शुद्ध तेवढी चांगली स्पंदने प्रक्षेपित हाेतात. दैनिकात संस्कृत सुभाषिते, श्लोक, संतांची सुवचने इत्यादी प्रसिद्ध केली जातात. यामुळे दैनिकाच्या सात्त्विकतेत मोलाची भर पडते.

२०.५.२०२१ पासून परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांना त्यांच्याकडून होणार्‍या व्याकरण आणि संकलन यांच्या स्तरांवरील लहान-मोठ्या चुका कळवण्यास आरंभ केला. (दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २४.५.२०२१ या दिवशीच्या अंकामध्ये सर्वाधिक चुका होत्या. या अंकातील ‘इन्फ्रारेड’ नकारात्मक ऊर्जा ८.७२ मीटर आणि सकारात्मक ऊर्जा ६.०६ मीटर होती.) जून २०२१ पासून साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुकांचे प्रमाण न्यून होण्यासाठी तळमळीने प्रयत्न आरंभ केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २.१०.२०२१ या दिवशीच्या अंकामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा पुष्कळ अधिक प्रमाणात (४०.८० मीटर) असल्याचे आढळून आले. यातून ‘दैनिकाशी संबंधित सेवा चुकांविरहित आणि परिपूर्ण केल्याने साधकांची साधना वृद्धींगत होऊन त्याचा सूक्ष्म परिणाम दैनिकावर झाला’, हे लक्षात येते, तसेच  दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांमुळे वाचकांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.१०.२०२१)

ई-मेल : [email protected]