कोलार (कर्नाटक) येथून दत्तपिठाकडे निघालेल्या बसवर धर्मांधांकडून दगडफेक : तिघे जण घायाळ

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्राबसवर धर्मांधांचे आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक

कोलार (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील चिक्कमगळुरू येथील बाबा बुडनगिरी येथील दत्तपिठाकडे श्रीराम सेनेचे कार्यकर्ते दत्तमाला धारण करून एका लहान बसमधून ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत दत्तपिठाकडे निघाले होते. तेव्हा त्यांच्या बसवर धर्मांधांकडून दगडफेक करण्याची घटना १३ नोव्हेंबर २०२१ ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथे घडली. कोलार येथील क्लॉक टॉवर जवळ असलेल्या विशाल मार्ट समोर ही दगडफेक करण्यात आली.

१. विशालमार्ट समोर क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वादावादी होऊन वसीम बेग याच्यावर अकबर एजाज आणि जुम्मू यांच्याकडून चाकूने आक्रमण करण्यात आले होते. त्या ठिकाणी लोक गटागटाने थांबले होते. त्याच वेळी घोषणा देत दत्तमालाधारी कार्यकर्त्यांची बस त्या मार्गावरून जात होती. त्या वेळी तेथे  असलेल्या काही धर्मांधांनी अचानक बसवर दगडफेकीला प्रारंभ केला; एवढेच नव्हे, तर बस अडवली. त्या वेळी काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नंतर ही बस तेथून लगेच निघाली. दगडफेकीमुळे बसमधील तिघे जण घायाळ झाले. ही घटना समजात कोलारनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

२. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत धर्मांधांना अटक करण्याची मागणी केली. यावर पोलिसांनी त्यांना ‘आरोपींना अटक करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिल्यानंतर कार्यकर्ते तेथून गेले.