पुणे – गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बनावट कागदपत्र वापरून भूमी मिळवून देणार्या टोळीला गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालय आणि खडकी न्यायालय यांच्या आवारात मिळून एकूण १० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड, सातबारा उतारे, छायाचित्र आणि रबरी शिक्के इत्यादी साहित्य शासनाधीन केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेतील उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्त यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून १० जणांना कह्यात घेतले. पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार या सर्वांनी मिळून ही कारवाई केली.अधिकारी