चीन सरकारच्या आदेशामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी !

चीन सरकारने नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा आदेश दिल्याचे प्रकरण

भारतात पुढे येणार्‍या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बीजिंग (चीन) – चीन सरकारने कोरोनाचा संभाव्य धोका असल्याचे सांगत काही दिवसांपूर्वी चिनी नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे आदेश दिला होता. तेव्हापासून चीनमधील बहुतांश शहरांतील मोठ्या बाजारांमध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

लोक आवश्यकतेपेक्षा अधिक सामान खरेदी करू लागले आहेत. अचानक मागणी वाढल्याने बाजारांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी बाजारांत धक्काबुक्की, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा आदेश देण्यामागे चीन तैवानशी युद्ध करण्याच्या सिद्धतेत असल्याचा संशय आहे.