साध्या गुन्हेगाराला अट्टल गुन्हेगार बनू देणारी यंत्रणा पालटायलाच हवी ! – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – सतत २ मास तपास करून ४५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या फूटेजची (चित्रीकरण) तपासणी करून शंकर जगले आणि संतोष घारे या दुचाकी चोरांना तळेगाव दाभाडे परिसरात पिंपरी-चिंचवड दरोडाविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २०० वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत. तसेच ३६ लाख रुपयांच्या ५१ दुचाकी गाड्या, १ रिक्शा, १ भ्रमणभाष हस्तगत केला आहे. (आरोपी एवढ्या चोर्या करेपर्यंत पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही का ? ही पोलिसांची निष्क्रीयताच आहे. – संपादक)
१७ व्या वर्षापासून वाहन चोरी करणार्या संतोषवर विविध ठिकाणी २०० वाहनचोरीचे गुन्हे नोंद आहेत, तर शंकर जगले याच्यावर घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, वाहनचोरी इत्यादी गुन्हे नोंद असून तो वर्ष २०१५ पासून पसार होता. (पहिल्याच गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा केली असती, तर पुढील गुन्हे करण्यासाठी त्यांची हिंमत झाली नसती. व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. – संपादक) आरोपी मौजमजेसाठी गाड्या चोरी करून ती गहाण ठेवत किंवा विक्री करत.