राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मिरजेत संचलन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात सहभागी स्वयंसेवक

मिरज, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मिरज शहरात ७ नोव्हेंबर या दिवशी संचलन पार पडले. ब्राह्मणपुरी येथील शिवाजी संघस्थानापासून या संचलनाचा प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन शिवाजी संघस्थानाजवळ त्याचा समारोप करण्यात आला. संचलनात फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये भारतमातेची प्रतिमा, भगवा ध्वज ठेवण्यात आला होता. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध अशा सदंड (लाठीधारी) आणि सघोष (वाद्यांसह) झालेल्या संचलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.