१. दुकानात साहित्य घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने लोलकाच्या साहाय्याने दुकानाच्या आत, बाहेर आणि फाटकाच्या बाहेर जाऊन परीक्षण करणे
‘मार्च २०२० मध्ये एक दिवस मी आमच्या दुकानात होते. तेव्हा समाजातील एक व्यक्ती दुकानात सामान घेण्यासाठी आली. मी त्यांना किराणा सामान मोजून देत होते. काही वेळानी त्यांनी त्यांच्या जवळचा लोलक (‘पेंड्युलम्’) काढला आणि खाली भूमीच्या दिशेने सोडून ते पाहू लागले. नंतर त्यांनी लोलकाच्या साहाय्याने दुकानातील ‘काऊंटरच्या’ पुढे, दुकानाच्या दाराच्या आत आणि ओसरीमध्ये (पोर्चमध्ये) परीक्षण केले. शेवटी लोखंडी फाटकाच्या आत आणि त्यानंतर त्यांनी फाटकाच्या बाहेरही जाऊन परीक्षण केले.
२. लोलकच्या अभ्यासामुळे ‘वास्तूत पुष्कळ सकारात्मक स्पंदने जाणवतात’, असे लक्षात येत असल्याचे त्या व्यक्तीने सांगणे त्या व्यक्तीशी माझे पुढील संभाषण झाले.
मी : आपण काय बघत आहात ?
व्यक्ती : तुमच्या वास्तूच्या फाटकाच्या आतील बाजू पूर्ण सकारात्मक आहे. ‘फाटकाच्या बाहेर लोलकाच्या साहाय्याने मोजले, तर तेथे नकारात्मकता आहे’, असे लक्षात येते. आपल्या वसाहतीमध्ये ७० टक्के नकारात्मक शक्ती आहे. मी लोलकाचा अभ्यास केला आहे; म्हणून मला हे समजले. साधना केल्यामुळे असे होऊ शकते.
मी : आम्ही आमचे गुरुदेव सांगतात, तसे करतो.
३. ‘सनातनचा आकाशकंदिल वर्षभर लावून ठेवल्यामुळे वास्तूत सकारात्मकता आहे’, असे लक्षात येणे
त्यानंतर ‘सनातनचा आकाशकंदिल वर्षभर लावून ठेवल्यामुळे वास्तू सकारात्मक झाली’, असे माझ्या लक्षात आले. केवळ आणि केवळ गुरुमाऊलींचा संकल्प असल्याने ही वास्तू सकारात्मक झाली आहे. ‘आम्हा दोघांच्याही मनात नकारात्मक विचार येत नाहीत’, असेही माझ्या लक्षात आले. हे सर्व परात्पर गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादामुळे होत आहे.
४. दिवाळीच्या आधी सनातनच्या आकाशकंदिलांची मागणी घेतांना समाजात त्याचे लाभ सांगता येणे आणि त्यांची पुष्कळ मागणी येणे
या प्रसंगानंतर दिवाळीच्या आधी समाजातून सनातनच्या आकाशकंदिलांची मागणी घेतांना त्यांना ‘आकाशकंदिल लावल्याने काय काय लाभ होऊ शकतात ?’, याविषयी सनातन संस्थेने सांगितलेले लाभ सांगितले. तेव्हा सर्व जण म्हणाले, ‘‘आम्हाला २ आकाशकंदिल द्या. आकाशकंदिल लवकर दिला, तर बरे होईल.’’ तर कुणी म्हणाले, ‘‘हा आकाशकंदिल मुलाच्या खोलीत लावतो.’’ मागील वर्षी मी केवळ ५ आकाशकंदिल घेतले होते. आता ३५ आकाशकंदिलांची मागणी आली आहे.
५. कृतज्ञता
‘देवा, मला काही येत नाही. तूच ही सेवा माझ्याकडून करवून घेतलीस. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’ अशा प्रकारे गुरुदेवांची कीर्ती पसरवण्याची संधी देवाने मला दिली, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.’
– सौ. पुष्पा शंकर बारई, नागपूर (१०.८.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |