शास्त्रानुसार सण साजरे करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले
दिवाळीच्या मंगलसमयी गुरुदेवांच्या चरणी गुणपुष्पे अर्पण करूया ।
वसुबारसेच्या शुभदिनी गोमातेकडून वात्सल्यभाव शिकूया ।। १ ।।
धन्वन्तरिदेवतेने जगण्याची संजीवनी दिली, तिच्याकडून समर्पणभाव शिकूया ।
नरकचतुर्दशीच्या दिवशी स्वभावदोष आणि अहं यांना ठेचून गुणांचे दीप लावूया ।। २ ।।
आपत्कालात साधनेसाठी श्री महालक्ष्मीमातेचा आशीर्वाद घेऊया ।
महालक्ष्मीमातेच्या चरणी लीन होऊन शरणागती वाढवण्यासाठी आशीर्वाद मागूया ।। ३ ।।
गुरु माता-पिता, गुरु बंधू-सखा, अशा गुरुमाऊलीला आत्मज्योतीने ओवाळूया ।
गुरुमाऊलीला अपेक्षित अशी आध्यात्मिक दिवाळी साजरी करूया ।। ४ ।।
– सौ. अपर्णा कुलकर्णी, दापोली, रत्नागिरी. (१२.११.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |