सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र उघडकीस आणणारे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. असे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्यांचा परिवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अन् राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक हे खालच्या पातळीवर जाऊन टीका करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ २३ ऑक्टोबरला सांगलीतील शिवतीर्थ येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘समीर वानखेडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘ड्रग्ज माफियांना पाठिशी घालणार्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.
सौजन्य : लोकशाही