विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणार्‍या युवकाला पोलीस कोठडी

दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या नीतीमत्तेचे उदाहरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – विवाह करण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी वेंगुर्ले तालुक्यातील एका युवकाला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित युवक गेली २ वर्षे विवाह करण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करत असे. या तक्रारीवरून पोलिसांनी १८ ऑक्टोबरला संशयित युवकाला अटक केली होती. त्याला १९ ऑक्टोबरला पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले.