नाही माझ्यात इतके सामर्थ्य, तुमचे रूप मी वर्णू शकेन ।
तुमचे स्वरूप चित्रात बद्ध मी करू शकेन ।
भगवंता, अशी विराट रूपी गुरुमाऊली ।
लाभली या जिवाला किती कृतज्ञता व्यक्त करू ।। १ ।।
नाही शब्दकोशात शब्द माझ्या ।
देवा, तुझ्या विराट कार्यात ।
सहभागी करून घे या जिवाला ।
सार्थकी लागू दे जीवन झिजून चरणी तुझ्या ।। २ ।।
देवा, तुझे प्रेम आणि कृपा मला सतत अनुभवता येवो ।
जाणून घे अंतरीचे भाव ।
नाही करू शकत मी व्यक्त ।
अज्ञानी जिवाला सामावून घे तुझ्या हृदयात ।। ३ ।।
– सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०१६)