समर्थ शिष्या आक्कास्वामी यांच्या चरित्राचे प्रकाशन !

समर्थ शिष्या आक्कास्वामी यांच्या चरित्राचे प्रकाशन करतांना १. पू. कौस्तुभबुवा रामदासी, तसेच मान्यवर

मिरज, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – समर्थ शिष्या आक्कास्वामी यांच्या चरित्राचा प्रकाशन सोहळा समर्थ शिष्या संत वेणास्वामी यांच्या मठात दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर या दिवशी पार पडला. सज्जनगड येथील व्यवस्थापक डॉ. नंदकुमार मराठे यांनी चरित्राचे लेखन केले आहे. या सोहळ्यासाठी मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी, कर्जत येथील वरिष्ठ कीर्तनकार श्री. शिरीषबुवा कुलकर्णी, दासबोध मंडळाचे शामराव साखरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. ‘एस्.के.इनव्हेस्टमेंट’चे श्री. स्वानंद कुलकर्णी यांनी यासाठी अर्थसाहाय्य केले आहे. सज्जनगडचे अधिकारी श्री. बाळासाहेब स्वामी यांचा संदेश मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी वाचून दाखवला. समर्थभक्त श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.