इंदूर (मध्यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक आणि सुटका

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांत मूर्तीपूजा नाकारणार्‍यांना उपस्थित रहाण्याचा काय अधिकार ? जर त्यांना हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर केवळ पुरुषच का ? मुसलमान तरुणी का नाही उपस्थित रहात ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात ! – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील गांधीनगरमध्ये असणार्‍या एका खासगी महाविद्यालयात आयोजित गरब्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अदनान शाह, महंमद उमर, अब्दुल कादिर आणि सय्यद साकीब या ४ मुसलमान युवकांना कलम १५१ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. बजरंग दलाने याविषयी पोलिसांत तक्रार केली होती. या चौघांची प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंड भरल्यानंतर सुटका करण्यात आली.

याविषयी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत चौबे यांनी सांगितले की, या मुलांची कार्यक्रमाच्या वेळी अन्य काही मुलांशी बाचाबाची झाली होती; म्हणून केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यांना अटक करण्यात आली.