देहली येथे पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक

  • १० वर्षांहून अधिक काळापासून देहलीत रहात होता !

  • शस्त्रसाठा जप्त

  • १० वर्षे एक पाकिस्तानी आतंकवादी भारताची राजधानी देहलीमध्ये निर्धाेकपणे राहून आतंकवादी कारवाया करत होता, हे सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद ! असे आणखी किती आतंकवादी देहली किंवा देशभरात रहात असतील, याची कल्पना करता येत नाही !
  • अशा आतंकवाद्यांना पोसत बसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
  • आतंकवाद्यांच्या समस्येवर ठोस उपाय पाकला नष्ट करणे, हा असल्याने शासनकर्ते तो कधी करणार ?
पाकिस्तानी आतंकवादी महंमद अशरफ उपाख्य अली

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने देहलीतून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक केली. महंमद अशरफ उपाख्य अली असे याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एके-४७ रायफल, १ हातबॉम्ब, २ अत्याधुनिक पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.

त्याच्याकडे बनावट भारतीय पारपत्र आढळले आहे. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून तो देहली येथे रहात होता. त्याने येथे एका भारतीय महिलेशी विवाहही केला आहे. अली याची चौकशी करत आहेत. त्याच्यासमवेत आणखी किती लोक आहेत ?, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अवघ्या ३ दिवसांपूर्वी देहलीमध्ये आतंकवादी आक्रमणाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर या आतंकवाद्याला अटक होणे महत्त्वाचे मानले जात आहे.