साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि मनापासून करणारा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. पुष्कर प्रशांत पिसोळकर (वय १७ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र  (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पुष्कर प्रशांत पिसोळकर हा एक आहे !

आज आश्विन शुक्ल पक्ष अष्टमी (१३.१०.२०२१) या दिवशी अकोला येथील कु. पुष्कर प्रशांत पिसोळकर याचा १७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. पुष्कर पिसोळकर

कु. पुष्कर प्रशांत पिसोळकर याला १७ वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भधारणेनंतर व्रते, उपवास आदी सात्त्विक कृती कराव्याशा वाटणे : ‘मला गर्भधारणा झाल्यानंतर ‘सतत उपवास आणि व्रते करावीत. केवळ सरबत पिऊन कडक उपवास करावेत’, असे वाटत होते. तेव्हा मी दूरचित्रवाणीवरील आनंदमूर्ती गुरुमा यांचा सत्संग, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत असे. अधिक मासामध्ये मी १५ दिवस उपवास केले. मी प्रतिदिन विष्णुसहस्रनाम वाचत असे, तसेच प्रतिदिन ३३ फुलवाती लावत असे.

१ आ. शस्त्रक्रियाच्या वेळी ‘डोक्याजवळ शृंगऋषि बसलेले आहेत आणि ते ‘काळजी करू नकोस. आम्ही आहोत’, असे म्हणत आहेत’, असे जाणवणे अन् त्यानंतर शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडणे : या आधी माझ्या २ बाळंतपणात शस्त्रक्रिया  झालेल्या असल्यामुळे पुष्करच्या जन्माच्या वेळी माझ्या आई-वडील आणि यजमान यांना पुष्कळ ताण आला होता; पण माझा देवावर विश्वास होता. शस्त्रक्रिया चालू असतांना ‘माझ्या डोक्याजवळ शृंगऋषि बसलेले आहेत आणि ते मला ‘काळजी करू नकोस. आम्ही आहोत’, असे म्हणत आहेत’, असे मला जाणवले. तिसरी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. मी शुद्धीवर आले. तेव्हा मी माझ्या आईला आणि यजमानांनाही हे सांगितले. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले.

२. जन्म ते ६ वर्षे

श्री. प्रशांत पिसोळकर

अ. तो ३ वर्षांचा असतांना मी महाशिवरात्रीच्या वेळी दिवसभर ‘ॐ नमः शिवाय ।’, असा जप करायचे. तेव्हा तो विचारायचा, ‘‘महादेवाचे दर्शन होईल का ?’’ रामनवमीला मी रामाचा जप केला, तर ‘राम दिसेल का ? हनुमान दिसेल का ?’, असे तो मला विचारायचा. तेव्हा तो पुष्कळ वेळ शांत बसून नामजप करायचा.

आ. साधारण ४ – ६ वर्षांचा असतांना तो संध्याकाळी ६ पूर्वीच जेवत असे. रात्री त्याच्या कितीही आवडीचा पदार्थ असला, तरी तो खात नसे. हे पाहून त्याची काकू सौ. माया पिसोळकर त्याला ‘जैनमुनी’ असे म्हणायची.

इ. रात्री झोपतांना तो ‘बाहेरचे ‘गेट’ लावणे, कुलूप लावणे, ‘घरातली सर्व दारे व्यवस्थित बंद आहे ना ?’, हे पहाणे आणि झोपतांना डोक्याजवळ पाण्याचे तांब्या-भांडे आणून ठेवणे’, असे तो प्रतिदिन करत असे.

३. वय ८ ते १६ वर्षे

अ. ८ व्या वर्षी त्याची मुंज झाली. त्या वेळी त्याने श्री विष्णुमामा राजंदेकर यांच्याकडून संध्या शिकून घेतली. तो २ वर्षे प्रतिदिन ३ वेळा नियमित संध्या करायचा; परंतु त्याची शाळा दुपारची झाल्यावर तो एकदाच संध्या करू लागला.

आ. तो सातवीत असल्यापासून प्रतिदिन अंघोळीनंतर ओलेत्याने गायत्री मंत्र, गणपतिस्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणत असे. हे सगळे तो न चुकता करत असे.

सौ. प्रज्ञा पिसोळकर

इ. तो सर्वांना साहाय्य करतो. तो कुणाविषयी कधीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि सर्वांचे ऐकतो.’

– सौ. प्रज्ञा प्रशांत पिसोळकर (आई)

ई. ‘तो पुष्कळ हुशार आहे. त्याने संगणकाचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही, तरीही त्याला संगणकाचे सर्व ज्ञान आहे.’

– श्री. प्रशांत मधुकर पिसोळकर (वडील)

४. स्वभावदोष :

‘सकाळी लवकर न उठणे आणि चिडचिड करणे’ – श्री. प्रशांत आणि सौ. प्रज्ञा पिसोळकर (१५.१०.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता