जळगाव शहरातील रस्ते दुरुस्त करा, अन्यथा कर वसुली थांबवा !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !

रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलनाची वेळ का येते ? पालिका प्रशासन इतके उदासीन का ? अशा कर्तव्यशून्य अधिकार्‍यांवर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

जळगाव – शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अन्यथा नागरिकांकडून केली जाणारी कर वसुली थांबवावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. वाहनचालकही त्रस्त झाले आहेत; मात्र तरीही पालिका प्रशासन गाढ झोपेत आहे. त्यांना जागे करण्यासाठी मनसेच्या आंदोलकांनी महापालिकेसमोर प्रतिकात्मक ‘झोप सोडा’ आंदोलन केले. तसेच येत्या ८ दिवसांत रस्त्यांची कामे चालू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.