५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. मोक्षद ओंकार भोसले (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मोक्षद ओंकार भोसले हा एक आहे !

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. मोक्षद ओंकार भोसले याच्याविषयी त्याची आजी सौ. विजया कणसे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. मोक्षद भोसले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गरोदरपण

१ अ. गरोदरपणात नियमित आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे 

१. माझी मुलगी सौ. ऋतुजा भोसले गरोदर असतांना नियमित रामरक्षा आणि अथर्वशीर्ष म्हणत असे. तसेच मीठ-पाण्याचे उपाय करणे, ‘कृतज्ञता गीत’ (परात्पर गुरु डॉक्टर यांच्या ७७ व्या जन्मदिनी म्हटलेले कृतज्ञतापर गीत) ऐकणे, पोटाला कापूर आणि अष्टगंध लावणे, असे उपायही ती करत असे.

२. सौ. ऋतुजाला तिसर्‍या मासापासून अकस्मात् त्रास होऊ लागला; म्हणून तिला आधुनिक वैद्यांना दाखवले असता त्यांनी तिला ९ मास (महिने) विश्रांती घेण्यास सांगितले. तेव्हा ती सातत्याने नामजपादी उपाय करत असे.

३. सातव्या मासामध्ये तिला पुष्कळ वेदना होऊ लागल्या. तिची ‘सोनोग्राफी’ केल्यावर ‘तिच्या गर्भाशयाला गाठ आहे आणि बाळाला गर्भात फिरण्यास अडथळा होत आहे’, असे लक्षात आले. त्या काळात तिने नामजपादी उपाय वाढवले. त्यामुळे तिचा त्रास हळूहळू उणावला.

१ आ. ‘बाळाला गुरुमाऊलींना भेटण्याची ओढ लागली आहे’, असे जाणवणे : तिने तिच्या सासरची कुलदेवता श्री खंडोबाचे नवरात्र केले. यासाठी तिला गुरुदेवांनीच शक्ती दिली. ती ‘कृतज्ञता गीत’ ऐकायची, तेव्हा तिला बाळाची हालचाल वेगाने होतांना जाणवायची. तेव्हा तिला ‘बाळाला गुरुमाऊलींना भेटण्याची ओढ लागली आहे’, असे जाणवायचे.

२. जन्म ते ३ मास

सौ. ऋतुजा भोसले

अ. बाळ जन्मल्यावर त्याच्या कपाळाच्या मध्यभागी त्रिशुळासारखी खूण होती. बाळ हातात दिल्यावर बालरोगतज्ञ म्हणाले, ‘‘हे बाळ इतर बाळांपेक्षा वेगळे वाटत आहे.’’

आ. मी (सौ. विजया कणसे) आणि बाळाचे आजोबा (श्री. विजय कणसे) यांनी बाळाकडे पाहिले असता आम्हाला ते पुष्कळ प्रसन्न आणि चांगले वाटले. बाळ हळूहळू डोळे उघडायचे, तेव्हा त्याच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर चांगले वाटायचे. बाळाची त्वचा चमकत असे.

इ. बाळाचा जन्म झाल्यापासून आम्ही त्याला अत्तर आणि कापूर लावणे, नामपट्ट्यांचे मंडल करणे आदी उपाय करत होतो. तसेच मोरपिसाने आवरण काढत होतो.

ई. ‘बाळ जन्मल्यापासून हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा करत आहे’, असे जाणवत होते. ते कधी अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट जोडायचे, तर कधी मधल्या बोटाला अंगठा लावण्याचा प्रयत्न करायचे.

उ. बाळाला अंघोळ घालणार्‍या मावशी बाळाला तेल आणि कापूर लावून मालीश करत असत. त्यांनी अंघोळ घालतांना ‘जय सद्गुरु’ म्हटल्यावर बाळ हुंकार देत असे.

३. वय ३ ते ४ मास

 ३ अ. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे एकटक पहाणे आणि हुंकार देत झोपणे : बाळासाठी (मोक्षदसाठी) कोणतीही कृती करतांना आम्ही प्रार्थना करायचो, तेव्हा तो हुंकार देत असे. तो झोपायचा, त्या ठिकाणी ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समोर ठेवलेला असे. तेव्हा तो गुरुदेवांच्या छायाचित्राकडे एकटक पहायचा आणि हुंकार देत झोपायचा.

३ आ. मोक्षद रात्री ‘कृतज्ञता गीत’ आणि छत्रपति शिवाजी महाराजांचा पाळणा ऐकवल्याविना झोपत नाही.

४. वय ४ ते ६ मास 

सौ. विजया कणसे

४ अ. सात्त्विकतेची आवड : मोक्षदला कापूर आणि अष्टगंध यांच्या डब्या, तसेच अत्तराची बाटली, यांच्याशी खेळायला पुष्कळ आवडते. त्याचा आहार सात्त्विक आहे. त्याला वरण-भात आणि केळी आवडतात.

५. वय ६ ते १० मास

५ अ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याप्रती भाव : या कालावधीत मोक्षद रांगण्याचा आणि उभे रहाण्याचा प्रयत्न करू लागला. आमच्या बैठकीच्या खोलीत (‘हॉल’मध्ये) ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ आणि श्रीकृष्णाचे चित्र आहे. मोक्षद रांगत जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ उभा रहातो आणि त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी त्यांच्या छायाचित्राकडे एकटक पहात हसतो. तसेच तो श्रीकृष्णाच्या चित्रासमोरही उभा राहून बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हसतो. आम्ही भ्रमणभाषमध्ये ‘कृतज्ञता गीत’ लावल्यावर गीताच्या शेवटी गुरुमाऊलींचे चरण दिसले की, तो लगेच डोके टेकून नमस्कार करतो. तो गुरुदेवांच्या चरणांकडे पुष्कळ वेळ कृतज्ञताभावाने पहात रहातो.

५ आ. आरती करायला आवडणे : मोक्षदला आरती करायला पुष्कळ आवडते. तो प्रतिदिन श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या छायाचित्राला उदबत्तीने ओवाळून आरती करण्याचा हट्ट करतो. आम्ही गुरुमाऊलींना साष्टांग दंडवत घालत असल्याचे पाहून तोही तशीच कृती करतो.

५ इ. आम्ही भावसत्संग आणि स्वभावदोष सत्संग ऐकत असतांना चि. मोक्षद शांतपणे शेजारी खेळत रहातो. त्याला साधकांचे बोलणे ऐकायला पुष्कळ आवडते.

६. चि. मोक्षदचे दोष 

हट्टीपणा

– सौ. विजया कणसे, सातारा (चि. मोक्षदची आजी) (जून २०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता