‘एकै साधे सब सधै । सब साधे सब जाय ।।’, हे संतवचन परमात्म्याच्या प्राप्तीविषयी आहे. ‘एका परमेश्वराची कृपा प्राप्त झाली की, सर्व साध्य होणारच आहे आणि अनेक गोष्टी साध्य करायचा प्रयत्न केल्यास काहीच साध्य होत नाही’, असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात हे वाक्य साधना केल्यानंतर मिळणार्या फळाच्या संदर्भात आहे. साधनेच्या प्रकारांच्या संदर्भात नाही.
‘एकै साधे सब सधै ।’ हे वचन ऐकून काही साधकांना वाटते की, केवळ व्यष्टी साधना केली की, सर्व साध्य होईल, तर काहींना ‘केवळ समष्टी साधना केली, तर सर्व साध्य होईल’, असा विचार येतो. प्रत्यक्षात तसे नाही, तर दोन्ही साधना एकत्र केल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते; म्हणून गुरुकृपायोगानुसार साधनेत आपण अष्टांग साधना, म्हणजे आठ प्रकारची साधना सांगतो.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०२०)