सर्व साधक अन साधिकांची तू आई ।
श्री सत्शक्ति तू,
लक्ष्मीचे रूप तुझे आई ।
तूच असशी ‘माझी बिंदाताई’ (टीप १) ।। १ ।।
पूर्वजन्मीचे नाते हे,
कृपादृष्टी असू दे ताई ।
तूच असशी माझी बिंदाताई ।। २ ।।
‘परात्पर गुरुदेवांचे स्मरण नित्य होऊ दे ।
अंतसमयी त्यांचे नाम मुखी येऊ दे’ ।। ३ ।।
असा आशीर्वाद मजला देई ।
आणिक मागणे नाही काही ।
तूच माझी बिंदाताई ।। ४ ।।
टीप १ : श्री सत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– श्री. सुधाकर जोशी (वय ९२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.७.२०२१)