काही वर्षांपासून मासिक पाळीच्या वेळी पोटात तीव्र वेदना होणे आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनेच्या संदर्भातील शिबिराला गेल्यावर मासिक पाळीच्या वेळी कोणताही त्रास न होणे

सौ. अंकिता शिरवाडकर

‘गेल्या काही वर्षांपासून मला मासिक पाळीच्या वेळी पोटात तीव्र वेदना होतात. या कारणामुळे मला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात होणार्‍या साधनेच्या संदर्भातील शिबिराला जाण्याची इच्छा नव्हती; परंतु साधिका सौ. मीना कामत यांनी मला ‘शिबिराला उपस्थित राहिल्यावर काय पालट जाणवतो ?’, ते अनुभवून तरी पहा’, असे सांगितले. त्यामुळे मी शिबिराला गेले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी मला मासिक पाळी आली; परंतु त्या काळात मला कोणताही त्रास झाला नाही. हा केवळ चमत्कारच आहे. शिबिराच्या कालावधीत मला आश्रमातील साधकांकडून पुष्कळ प्रेम मिळाले. मी सौ. मीना कामत आणि सनातन संस्था यांची कृतज्ञ आहे.’

– कु. अंकिता कुमटाकर (आताच्या सौ. अंकिता राहुल शिरवाडकर), पणजी, गोवा. (८.११.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक