कोणतीही साधना करण्याचा मुख्य उद्देश ‘स्वतःला विसरून इष्टदेवतेच्या अनुसंधानात रहाणे’ हा असतो. कर्मकांड करतांना व्यक्ती उपवास, पूजा आणि पारायणे यांच्या माध्यमातून त्या वेळेपुरती देवतेच्या अनुसंधानात रहाते. साधना न करणार्या व्यक्तीला देवतेच्या अनुसंधानात रहाण्याची हळूहळू सवय लागावी, यासाठी कर्मकांड साहाय्यक ठरते. एखादी व्यक्ती नियमित साधना करू लागल्यावर ती प्रत्येक कृती आणि प्रसंग यांमध्ये देवतेच्या अनुसंधानात राहून कर्म करते. त्यामुळे तिला कर्मकांड करण्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात लाभ होतो. साधनेच्या या टप्प्याला तिने उपवास, पूजा, पारायण यांसारखे कर्मकांड करण्याची आवश्यकता रहात नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.९.२०२१)