चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

चेन्नई – पतंजलि योग समितीच्या वतीने पितृपक्षानिमित्त २५ सप्टेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी योग वेदांत समितीच्या वतीने नियमित घेण्यात येणारे प्राणायामाचे सत्र पार पडले. त्यानंतर पू. (सौ.) रविचंद्रन् यांना पितृपक्षानिमित्त श्री दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व सांगितले. या वेळी मार्गदर्शन करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी भगवान दत्त यांचा जन्म आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट केली. तसेच पितृपक्षामध्ये श्री दत्ताचा नामजप करणे का आवश्यक आहे ? याचीही माहिती दिली. या वेळी जिज्ञासूंनी ‘दोन्ही पालक जिवंत असतांना महालय श्राद्ध करावे का ?’, ‘केवळ आईचे निधन झाले असेल, तर महालयात श्राद्ध करायचे का ?’, ‘विशिष्ट तिथीला श्राद्ध करण्यात अडचण असेल, तर त्याला पर्याय काय ?’, आदी विविध प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी परिपूर्ण उत्तरे दिली. या सत्संगाचे आयोजन पतंजलि योग समितीच्या आचार्य सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी केले होते.

क्षणचित्रे

१. सौ. जमुना गणेश यांनी श्री दत्ताचा नामजप केल्यामुळे त्यांच्या जावयाचे प्राण कसे वाचले, याविषयी अनुभूती सांगितली.

२. सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.