मंदिरांची आवश्यकता !

मंदिरांतील वातावरणाचा परिणाम जिवांसाठी प्रेरणादायी असल्याने मंदिरांची आवश्यकता आहे !

‘या आधुनिक यंत्रयुगात आपण जे विश्व निर्माण करत आहोत, त्यात मंदिराला फारसे महत्त्व उरलेले नाही. आपल्याला वेगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत. आपल्याला शाळा, रुग्णालये, वाचनालये या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात; परंतु या सर्व ऐहिक गोष्टी आहेत. या गोष्टींद्वारे त्या पलीकडे असणार्‍या परमेश्वरी तत्त्वाशी संबंध स्थापन करता येत नाही. आपण मंदिरात जात नसलो, तरी त्यांच्या जवळून जातांना मंदिरातील घंटानाद, शंखनाद, भजनांचे आवाज, प्रार्थनेचे स्वर किंवा भक्तीगीताचे स्वर तुमच्या कानी पडतात. तेसुद्धा पवित्र वातावरण, देवाचा सहवास आणि प्रेरणा देणारे असते; म्हणून मंदिरांची आवश्यकता आहे.’

(‘मंदिरे शक्ती आणि चैतन्य यांचे स्रोत असतात. त्यातील शक्तीचे प्रक्षेपण सर्व दिशांत होऊन त्या माध्यमातून वायूमंडल आणि जीव यांची शुद्धी होते. त्यामुळे मंदिरांची आवश्यकता आहे.’ – संकलक)

– ज्योतिषी चिंतामणी देशपांडे (गुरुजी) (साभार : ‘सज्जनगड मासिक पत्रिका’ सप्टेंबर २०१८)