साधना करता करता । मन गुरुचरणी विसावू लागते ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले

कुठे तरी मन गुंतवणे जरूरी असते ।
जळी, स्थळी, पाषाणी जमेल तिथे ।
देवत्व शोधणे जरूरी असते ।। १ ।।

बालपणी खेळात, पुस्तकात, स्पर्धेत ।
तर यौवनात मन देहभावात हरवून जाते ।
श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत ।
आदी तुलनेत मन मग्न असते ।। २ ।।

अहंभाव वाढत जातो ।
ते मनाला समजतच नाही ।
षड्रिपूंशी झुंज देतांना ।
मन अगदी थकून जाते ।। ३ ।।

गुरुविना तरणोपाय नाही ।
हे कुणीतरी सांगावे लागते ।
साधना करता करता ।
मन गुरुचरणी विसावू लागते ।। ४ ।।

– श्री. व्यंकटेश बेलापूरकर, कुर्ला, मुंबई. (२९.४.२०२०)