उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रार्थना अजित डाके ही आहेत !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्म ते ३ वर्षे
१ अ. ‘कु. प्रार्थना ३ – ४ मासांची असतांना तिच्याशी बोलल्यावर ‘ती लक्ष देऊन सर्व ऐकत आहे’, असे मला वाटायचे.
१ आ. ती खोलीत लावलेल्या श्री स्वामी समर्थांच्या छायाचित्राकडे बघत रहायची. तिला नामजप केलेला आवडायचा.
१ इ. ती एक वर्षाची झाल्यावर आम्ही तिचा तिथीनुसार वाढदिवस साजरा केला. तेव्हा तिला सर्दी आणि खोकला झाला होता. त्या वेळी पुष्कळ लोक आले होते, तरी ती एकदाही रडली नाही आणि त्या रात्री ती बारा वाजेपर्यंत जागी होती.
१ ई. तिला देवपूजा करायला आवडते. ‘मीच देवबाप्पाला अंघोळ घालणार’, असे म्हणून ती हट्ट करायची.
२. ४ वर्षे ते ११ वर्षे
२ अ. देवाची आवड
१. प्रार्थना रात्री लवकर झोपायची नाही. तेव्हा ती ‘देवाच्या गोष्टी सांग किंवा माझ्या पाठीवर देवबाप्पाचा नामजप लिही’, असे सांगायची. मी तिच्या पाठीवर नामजप लिहिल्यावर ती थोड्या वेळात झोपायची. ‘तिला कुठल्या देवाला कुठले फूल प्रिय आहे’, हे सांगितले होते. ते तिने तोंडपाठ केले होते.
२. तिला श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ आवडतात. तिची त्यांच्यावर श्रद्धा आहे. ती प्रतिदिन श्रीकृष्णाशी बोलते आणि त्याला पांघरूण घालून झोपवते.
२ आ. सहनशील : ती पुष्कळ सहनशील आहे. ती बालवाडीत असतांना रुग्णाइत होती; म्हणून तिला सलाईन लावले होते. दोन दिवसांनी तिच्या शाळेत स्नेहसंमेलन होते. तिने गणेशवंदना नृत्यात भाग घेतला होता; म्हणून हट्ट करून तिने हातात सुई असतांनाही नृत्य सादर केले. नंतर पुन्हा आधुनिक वैद्यांनी तिला सलाईन लावले. त्याच वर्षी तिला ‘आदर्श विद्यार्थिनी’ म्हणून पुरस्कार मिळाला होता.
२ इ. ऐकण्याची वृत्ती : कधी तिला कंटाळा आला असेल, तेव्हा तिला काही काम सांगितले तरी ती ऐकते आणि सांगितलेले काम करते. ती सर्वांशी प्रेमाने वागते.
२ ई. प्रामाणिकपणा : ती कधीच खोटे बोलत नाही. ती रात्री झोपतांना स्वतःच्या चुका स्वीकारते आणि क्षमा मागते.
२ उ. जिज्ञासू : ती सारखे प्रश्न विचारते आणि तिचे समाधान होईपर्यंत पाठपुरावा करते. ती अभ्यासात हुशार आहे.
२ ऊ. नम्र : तिला जी गोष्ट येते, ती दुसर्यांना शिकवतांना ‘मला चांगले करता येते’, असा तिचा भाग नसतो.
२ ए. शिकण्याची वृत्ती : तिला नवीन गोष्टी शिकायला पुष्कळ आवडतात. ती दळणवळण बंदीच्या काळात आजीकडून श्रीसूक्त, महागणेशपंचरत्न, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, गीता, विष्णुसहस्रनाम इत्यादी स्तोत्रे म्हणायला शिकली. तिचे उच्चार स्पष्ट आहेत. तिला विज्ञानातील प्रयोग करायला, आकाश निरीक्षण आणि ग्रहतारे यांच्याविषयी माहिती घ्यायला आवडते.
२ ऐ. सात्त्विकतेची ओढ
१. ती कापूर-अत्तर लावणे, स्वतःवरील आवरण काढणे, नामजप करणे इत्यादी उपाय नियमित करते.’
– सौ. गीता डाके (आई)
२. ती प्रतिदिन मनापासून नामजप करते. – सौ. रुक्मिणी डाके (आजी), इचलकरंजी
२ ओ. धर्माचरणाची आवड
१. ती शाळेत जातांना आणि प्रतिदिन रात्री झोपतांना कुंकू लावते. ती शाळेतील ज्या मैत्रिणींना देवाची आवड आहे, त्यांना नामजपाचे महत्त्व सांगते.’
– सौ. गीता डाके
२. ‘आम्ही प्रतिदिन अग्निहोत्र करतो. त्यात तिचा पुष्कळ सहभाग असतो.’ – सौ. रुक्मिणी डाके
२ औ. भाव : ‘तिला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण आल्यावर ती पुष्कळ रडते. तेव्हा मला तिची समजूत घालता येत नाही. ती व्याकुळतेने मला सांगते, ‘आई, मला या जन्मात एकदा तरी परात्पर गुरु डॉक्टरांना बघायचे आहे. मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे.’ तिचे हे बोलणे ऐकून माझी भावजागृती होते.
३. स्वभावदोष
हट्टीपणा, स्वतःचेच खरे करणे, चिडचिडेपणा.’
– सौ. गीता डाके (आई), इचलकरंजी, कोल्हापूर (११.७.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |