सनातन संस्थेच्या कार्याला विरोध न करता साहाय्य करणारे एका तालुक्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ! 

१. एका तालुक्याच्या ठिकाणी रहाण्यास गेल्यावर तेथील पोलीस वसाहतीत सनातनच्या साधकांची ये-जा चालू होणे; पण त्याविषयी पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांनी कुणीही आक्षेप न घेणे

‘माझे एका गावातून एका तालुक्याच्या ठिकाणी स्थानांतर झाले. गावाच्या ठिकाणी असतांना माझ्या घरी प्रतिदिन सनातन संस्थेच्या साधकांचे येणे-जाणे असायचे. ‘आता तालुक्याच्या ठिकाणी साधकांचे येणे-जाणे होईल का ?’, असे आम्हाला (मला आणि माझ्या पत्नीला) वाटत होते. यापूर्वी मी कधीच पोलीस वसाहतीमध्ये राहिलो नव्हतो; पण तालुक्यातील पोलीस वसाहत बसस्थानकासमोरच असल्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला रस्त्याच्या जवळची खोली मिळाल्याने मी तेथे राहू लागलो. तेथेही साधकांचे येणे-जाणे चालू झाले. ‘आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत’, हे वसाहतीमधील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना ठाऊक होते; परंतु यावर कुणीही आक्षेप घेतला नाही.

२. सनातन संस्थेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याने त्याची सर्व सिद्धता पोलीस वसाहतीतच चालू असणे

वर्ष २००५ किंवा २००६ च्या सुमारास मी रहात असलेल्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सेवेला १५ दिवस आधीपासून येणार्‍या साधकांसाठी अल्पाहार आणि जेवण यांची व्यवस्था आमच्या घरी करण्यात आली होती. त्यामुळे १५ दिवस साधकांचे येणे-जाणे चालू होते. सभेसाठीचे सर्व साहित्य आमच्या घराच्या समोरच ठेवण्यात आले होते. साधक त्यांची वाहनेही पोलीस वसाहतीमध्येच लावत होते (पार्क करत होते). सभेचा प्रसार होण्यासाठी वाहनांवर कापडी फलक, तसेच ध्वनीक्षेपक लावणे इत्यादी सेवा पोलीस वसाहतीमध्येच केल्या जायच्या.

३. सभेच्या पूर्वसिद्धतेला कुणीही विरोध न करणे, पोलीस निरीक्षकांनी सनातन संस्थेच्या सभेसाठी अर्पण देणे आणि सभास्थळी पोलीस बंदोबस्तही ठेवणे

मी रहात असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी ५० टक्के हिंदू आणि ५० टक्के मुसलमान अशी लोकसंख्या आहे. पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. बाजूने शहरातील मुख्य रस्ता जातो. त्यामुळे पोलीस वसाहतीमध्ये चालू असणारी सभेची सिद्धता मुख्य रस्त्यावरून ये-जा करणारे लोकही पहायचे; परंतु त्याविषयी कुणीही कधीच तक्रार केली नाही. पोलीस निरीक्षकांनीही पोलीस वसाहतीमध्ये काय चालू आहे, याविषयी कधी विचारणा केली नाही. पोलीस निरीक्षकांना हिंदु धर्माविषयी आदर होता. ते त्याविषयी उघडपणे बोलत नसत; परंतु सनातनविषयी त्यांचे मत चांगले होते. त्यांनी सभेसाठी अर्पण दिले, तसेच सभेच्या दिवशी सभास्थळी चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्तही ठेवला होता. ते स्वत:ही सभेला उपस्थित होते. हे सर्व केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच घडू शकले !’ – एक माजी पोलीस अधिकारी


पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे चांगले आणि कटू अनुभव कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

पोलीस-प्रशासन यांच्याविषयी आलेले चांगले आणि कटू अनुभव पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : [email protected]


सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

 

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक 


पोलिसांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे आवश्यक !

एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेचे अन्वेषण पोलीस निरीक्षकाने प्रामाणिकपणे केल्यामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होणे

‘मी एका गावाच्या ठिकाणी कार्यरत असतांना पोलीस ठाण्याचे कार्यालयीन काम पहात होतो. एके दिवशी बाजारपेठेतील एका व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. त्यामुळे तेथील दुकानदारांनी त्वरित आपापली दुकाने बंद केली आणि ते तेथून निघून गेले. आम्ही त्या व्यक्तीचे प्रेत प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून शवागृहात ठेवले. तेवढ्यात पोलीस निरीक्षक आले. वास्तविक ते भ्रष्ट होते; पण त्यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे हाताळले. त्यांनी ५ आरोपींना तात्काळ अटक केली. या प्रकरणात सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. या आरोपींमधील एक आरोपी प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीचा भाऊ होता. त्यामुळे त्याने आरोपींच्या वतीने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर आरोपी जामिनावर सुटले. जन्मठेप होऊनही जामीन मिळाल्याने आरोपी मोकाट आहेत.’ – एक माजी पोलीस अधिकारी