‘बाळाजी जनार्दन भानु हे नाना फडणीस यांचे खरे नाव. वर्ष १७४२ ते १८०० ही त्यांची कारकीर्द. श्रीवर्धन येथील वेळास हे त्यांचे मूळ गाव; पण नानांचा जन्म झाला सातारा येथे, तर निधन झाले पुणे येथे. पुढे नाना फडणीसांचे ‘फडणवीस’ म्हणजे आजच्या भाषेत पेशव्यांचे ‘अर्थमंत्री’ झाले. माधवराव पेशव्यांनंतर नानांनी ‘बारभाईचा कारभार’ चोखपणे पाहिला. ही त्यांची मोठी कामगिरीच म्हणावी लागेल. राज्याची धुरा त्यांनी जवळपास २० वर्षे पाहिली. राघोबादादांविषयी तर नाना फडणीस केवळ आधारस्तंभ होते. नानांच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सवाई माधवराव पेशवे यांना लहानाचे मोठे केले. बारभाई कारस्थान स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे केले. ‘जब तक नाना, तब तक पूना’ हे हिंदी भाषेतील सुभाषित प्रसिद्ध आहे. नाना फडणीस शौर्याच्या संदर्भात अल्प असले, तरी ‘नानांसमवेत मराठेशाहीतील शहाणपण लयाला गेले’, हे कर्नल पामर यांचे मत आज सर्वसामान्य झाले.’
– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक नोव्हेंबर – डिसेंबर २०११)