गोवा पायाभूत विकास महामंडळ ३१ औद्योगिक भूखंडांचा लिलाव करणार

पणजी – गोवा पायाभूत विकास महामंडळ वेर्णा, गोवा येथील ३१ प्रमुख औद्योगिक भूखंडांचा लिलाव करणार आहे. महामंडळाने हे औद्योगिक भूखंड दीर्घ कालावधीसाठी लीजवर (ठराविक कालावधीसाठी वापर करण्याच्या करारावर) देण्याच्या दृष्टीने ई-टेंडर (निविदा) आणि ई-ऑक्शन (लिलाव) करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भूखंडांचे आकार १ सहस्र ५०६ चौरम मीटरपासून ४५ सहस्र चौरस मीटरपर्यंत आहेत. भूखंडांसाठीचा मूलभूत दर ५ सहस्र रुपये प्रति चौरस मीटर आहे. याविषयीची अधिक माहिती https://eprocure.goa.gov.in/  (Tender ID 2021_GIDCo_111_1 ) यावर आहे.