गोव्यातील पोलिसांचा विदेशींना धाक नसल्याचेच हे द्योतक आहे ! – संपादक
पणजी – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ मध्ये गोव्यात आलेल्या विदेशींच्या संदर्भात घडलेल्या गुन्हेगारी घटनांपेक्षा विदेशींनी गोव्यात केलेले गुन्हे जवळपास ८ पटींनी अधिक आहेत. वर्षभरात विदेशींच्या संदर्भात ११ गुन्हे नोंद घडले आहेत, तर विदेशींनी केलेले गुन्हे ८० आहेत.
विदेशींच्या विरोधातील गुन्हे आणि विदेशींनी केलेले गुन्हे या दोन्हींमध्ये वर्ष २०१९च्या तुलनेत घट आहे. वर्ष २०१९ मध्ये विदेशींच्या संदर्भात सर्व राज्यांत मिळून १२७ गुन्हे घडले होते आणि विदेशींनी १ सहस्र ७५४ गुन्हे केले होते, तर गोव्यात त्यांच्या संदर्भात २२ आणि त्यांनी केलेले गुन्हे ११० होते. कोरोना महामारीतील संचारबंदीमुळे गोव्यात विदेशींच्या संख्येत घट झाल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही घटले आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गोव्यात अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेले बहुतांश नागरिक हे रशिया आणि नायजेरिया या देशांतील असतात.