दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० मे २०२१ पासून दैनिकातील अनेक चुका लक्षात आणून देण्यास प्रारंभ केला. शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील अशा लहान लहान चुकांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी झाली. साधनेसाठी हानीकारक ठरलेल्या चुकांचे स्वरूप साधकांना लक्षात यावे, सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510920.html
तसेच चुका कशा प्रकारच्या असतात, हे कळण्यासाठी सदर प्रसिद्ध करत आहोत. साधकांनी सेवा करतांना योग्य ती काळजी घेऊन परिपूर्ण सेवा करावी.
साधकांनो, तुम्हीही या पद्धतीने तुमच्या सेवेच्या स्तरावरील चुकांचा अभ्यास केल्यास तुमची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होईल !दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील साधकांनी त्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्यांची साधना व्हावी, यासाठी त्यांच्या चुका किती गांभीर्याने घेऊन त्यावर प्रयत्न चालू केले आहेत, हे या लेखमालेतून लक्षात येते. अशाच प्रकारे ग्रंथ, कला, संगीत, लेखा, ध्वनीचित्रीकरण, संशोधन, प्रसार इत्यादी सेवा करणार्या आणि इतर सर्वच साधकांनी स्वतःच्या सेवेच्या संदर्भातील चुका लक्षात घेऊन अंतर्मुख होऊन त्यांवर या पद्धतीने प्रक्रिया केल्यास त्यांच्याही चुका अल्प होतील आणि त्यांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक-संपादक, सनातन प्रभात – श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (१३.८.२०२१) |