ऋषिपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात अथर्वशीर्ष पठण !

कोरोनाच्या संसर्गामुळे ५ महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण

पुणे – ऋषिपंचमीच्या निमित्ताने येथील दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसर्‍या वर्षी मुख्य मंदिरात ५ महिलांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ६ वाजता शंखनाद करत ‘अथर्वशीर्ष’ पठण करण्यात आले. या सोहळ्यात ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहस्रो गणेशभक्त सहभागी झाले होते, तसेच त्यांनीही स्वत:च्या घरातूनच श्री गणपति अथर्वशीर्ष पठण केले. या वेळी भाविकांनी ‘कोरोनाच्या संसर्गाचे संकट दूर होऊ दे’, अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना केली.