हिंदुत्वनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी बंद न केल्यास आंदोलन ! – दीपक शिंदे-म्हैशाळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

दीपक शिंदे-म्हैशाळकर

मिरज, १३ सप्टेंबर – शांतताप्रिय मार्गाने, तसेच लोकशाही मार्गाने वर्षानुवर्षे कार्यरत असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांची सातत्याने मुस्कटदाबी केली जात आहे. हा प्रकार बंद न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैशाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भाजपचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख श्री. ओंकार शुक्ल यांना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाने तडीपारीची नोटीस दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर  दीपक शिंदे-म्हैशाळकर यांनी हे पत्रक काढले आहे.

दीपक शिंदे-म्हैशाळकर यांनी दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद नसतांना राजकीय आंदोलनातील गुन्ह्यांच्या आधारे भाजपच्या ठराविक कार्यकर्त्यांवर प्रत्येक वेळी सणासुदीच्या तोंडावर तडीपारीची नोटीस देण्यात येत आहे. गंभीर गुन्हे करणारे आरोपी मात्र रस्त्यावर मोकाट फिरत आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या संदर्भात जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात येत आहे.