(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांना समाजात भेद निर्माण करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे !’ – डॉ. दीपा सुंदरम्, डेन्व्हर विद्यापीठ, अमेरिका

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचा ३ रा दिवस  

  • हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर डॉ. दीपा सुंदरम् यांच्यासारख्यांची हिंदुद्वेषाची प्रसारण करणारी दुकाने कायमची बंद होणार आहेत. त्यामुळेच त्यांना हिंदु राष्ट्राची भीती वाटते, हे लक्षात घ्या ! – संपादक 
  • भारतात हिंदू बहुसंख्य आहे; म्हणून सामाजिक सलोखा टिकून आहे. हिंदू आक्रमक झाले असते, तर अल्पसंख्यांकांना भारतातून पळ काढावा लागला असता. हे सत्य वैचारिक आतंकवादी असणार्‍या डॉ. सुंदरम् हिंदुद्वेषामुळे स्वीकारत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक 

मुंबई – हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दंगली, हिंदु स्त्रियांवर होणारे बलात्कार, हिंदूंच्या हत्या यांसाठी निधर्मीवाद उत्तरदायी आहे, असे हिंदुत्वनिष्ठांना वाटते. ‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेत घातलेला निधर्मी (सेक्युलर) शब्द पालटू शकतो’, असे हिंदुत्वनिष्ठांना वाटते. (दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडला. हे कृत्यच घटनाविरोधी होते. याविषयी हिंदुविरोधकांनी बोलावे ! – संपादक) ‘इस्लामी विचारसरणी हिंदु तत्त्वज्ञानावर, महिलांवर आघात करत आहे’, असे ते मानतात. (यात चूक ते काय ? – संपादक)हिंदुत्वनिष्ठ निधर्मीवाद ही संकल्पना समाजात भेद निर्माण करण्यासाठी वापरत आहे. असा भेद निर्माण करून त्यांना हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे, असे वक्तव्य अमेरिकेतील डेन्व्हर विद्यापिठाच्या साहाय्यक प्राध्यापक डॉ. दीपा सुंदरम् यांनी केले. डॉ. सुंदरम् या विद्यापिठामध्ये हिंदु धर्माविषयी विद्यार्थ्यांना शिकवतात. (अशा प्राध्यापिका विद्यापिठातील विद्यार्थ्यांना हिंदुविरोधी तत्त्वज्ञान शिकवत असणार, हे निश्‍चित. अमेरिकेतील हिंदुद्वेष परसरण्यामागे तेथील विद्यापिठे कशी कार्यरत आहेत, हे यातून दिसून येते ! – संपादक) १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्तरावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन) या ‘ऑनलाईन’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात त्या बोलत होत्या. ‘मोदी सरकार आणि त्याची हिंदुत्वाची संकल्पना भारताच्या विविधतेवर घाला घालते’, असेही त्या म्हणाल्या.

भाजप माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत असल्यामुळे हिंदुविरोधी पत्रकाराला पोटशूळ !

भाजपने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नियोजनबद्ध गुंतवणूक केली आहे. भाजप सरकारने प्रसारमाध्यमांना डावलून स्वतःचे ‘नमो अ‍ॅप’सारखे अ‍ॅप निर्माण केले आहे. अत्यंत प्रभावीपणे ‘मिडिया आयटी सेल’चा वापर भाजपने केला. (हिंदूंना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे डोस पाजणार्‍या निधर्मींचा हा दुटप्पीपणा आहे, हे लक्षात घ्या ! सध्याच्या आधुनिक जगात एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाने स्वतःच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हिंदुविरोधकांना पोटशूळ का उठतो ? हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी हिंदुविरोधक किती खालच्या थराला जाऊन विरोध करतात, याचे हे उदाहरण ! – संपादक) हिंदुत्वाचा विचार पुढे आणण्यासाठी भाजपने फेसबूक गट बनवले आहेत. फेसबूक आणि संघ अन् शासन यांमध्ये करार झाला आहे. (फेसबूकवर अनेक जिहादी आतंकवादी संघटनांची खाती आहेत. त्याविषयी सिरिल सॅम का बोलत नाहीत ? – संपादक) याद्वारे हिंसक विचार पसरवले जातात, असे भारतातील हिंदुविरोधी पत्रकार सिरिल सॅम यांनी पहिल्या सत्रात सांगितले.