गणेशभक्तांना नम्र विनंती !

श्री गणेशचतुर्थी निमित्त काही जण घरी जाण्यापूर्वी एकमेकांशी बोलतांना ‘मी गणपतीला घरी जाणार आहे’, ‘गणपतीला जाण्यासाठी माझे तिकिट आरक्षण झालेले नाही’, किंवा ‘दळणवळण बंदीमुळे (लॉकडाऊनमुळे) घरी जाता येत नाही’, असे बोलतांना आढळतात. तरी गणेशभक्तांनी ‘गणपतीला घरी जाणार आहे’ असे न म्हणता  ‘श्री गणेशचतुर्थी’ला किंवा ‘श्री गणेशोत्सवाला घरी जाणार आहे’ अशा योग्य शब्दांचा वापर करावा.

– श्री. अरुण कुलकर्णी, महालक्ष्मी, बांदोडा, फोंडा, गोवा.