‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या परिषदेच्या विरोधात कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे धनबाद (झारखंड) येथे निवेदन

धनबाद (झारखंड) – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या परिषदेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजन करणारे, यात सहभागी होणारे आणि त्याला साहाय्य करणारे यांच्यावर भारत सरकारने कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या परिषदेमध्ये हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील धार्मिक सौहार्दाला धोका पोचू शकतो. हे लक्षात घेऊन या परिषदेमध्ये सहभागी होणारे वक्ते आणि आयोजक यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी समितीचे श्री. अमरजित सिंह प्रसाद आणि ‘तरुण हिंदू’ संघटनेचे बप्पा सरकार हे उपस्थित होते.