भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
बादामी (कर्नाटक) – जयनगर येथील नागरिकांच्या सुविधांसाठी राखून ठेवलेल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जागेवर प्राचीन शिवलिंग अणि मंदिरे आहेत. ही मंदिरे हटवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालू केल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याला विरोध केला आहे. या भूमीवरील मंदिरे चालुक्य काळातील असल्याचे सांगितले जात आहे.
श्रीराम सेनेकडून मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याला विरोध केला जात आहे. बाळ्ळारी विभागाचे श्रीराम सेनेचे अध्यक्ष संजीव मरडी यांना धमकीचे दूरभाष येत असल्याचे म्हटले जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून वसतीगृह बांधण्याचे समर्थन केले जात आहे. (काँग्रेसवाले हिंदुविरोधी कृत्याचे नेहमीच समर्थन करतात, याचे हे आणखी एक उदाहरण ! – संपादक) या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांकडून मरडी यांना धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. ‘आमदार सिद्धरामय्या यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी मंदिरे हटवून दाखवावीत’, असे आव्हान मरडी यांनी दिले आहे.