श्रीकृष्ण जयंतीला हिंदु मैत्रिणीला मांस खाऊ घातल्याने मला शांती मिळायची ! – लेखिका चुगतई

२० व्या शतकातील उर्दू लेखिका इस्मत चुगतई यांच्या आत्मकथेतील हिंदुविरोधी सूत्रे ‘बीबीसी’कडून प्रसारित !

  • धर्मांधांना लहानपणापासून हिंदुद्वेष शिकवला जातो. तेव्हापासून त्यांची मानसिकता हिंदुविरोधी बनते. यातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पना किती खुळी आहे आणि ती अंगीकारणारे हिंदू किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते ! 
  • इस्मत चुगतई यांचा उदोउदो करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता काही बोलतील का ? कि मौन बाळगून चुगतई यांनी केले ते योग्य होते, याला सहमती दर्शवतील ?
  • हिंदूंना आक्रमक ठरवून पुरस्कार परत करणारे साहित्यिक आता याविषयी काय बोलणार आहेत ?
लेखिका इस्मत चुगतई

नवी देहली – फळे, दालमोठ (तेल अथवा तूप यांत तळलेली डाळ) आणि बिस्किटे यांमध्ये स्पर्श न करण्यासारखे काही नव्हते; म्हणून मी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी माझी हिंदु मैत्रीण सुशी हिला फसवून मांस खाऊ घालायचे. त्यामुळे मला शांती मिळायची, असे उर्दू लेखिका इस्मत चुगतई हिने तिच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने ‘बीबीसी’ वृत्तसंकेतस्थळाने भारतीय उर्दू लेखिका इस्मत चुगतई यांच्या ‘कागजी है पैरहन’ या आत्मचरित्रातील काही भाग प्रकाशित केला आहे. या आत्मचरित्रामध्ये इस्मतने तिच्या बालपणीच्या आठवणी नमूद केल्या आहेत. चुगतई यांचा जन्म वर्ष १९१५ मध्ये उत्तरप्रदेशातील बदायूं जिल्ह्यात झाला होता आणि वर्ष १९९१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. (‘बीबीसी’ वृत्तवाहिनी आणि तिचे संकेतस्थळ हिंदु धर्म अन् देवता यांचे सर्रास विडंबन करत असतात. त्यासाठी ‘श्रीकृष्ण जयंती’सारखा पवित्र दिन निवडून जगाच्या विस्मृतीत गेलेल्या २० व्या शतकातील एका लेखिकेच्या आत्मचरित्रातील अशी सूत्रे प्रसारित करण्याची काय आवश्यकता होती ? यातून बीबीसीचे संपादक मंडळ आणि पत्रकार यांच्या नसानसांत हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे, हे लक्षात येते ! हिंदूंनी अशा बीबीसीवर बहिष्कारच घालायला हवा ! – संपादक)

आत्मचरित्रामध्ये लेखिका इस्मत चुगतई यांनी म्हटले,

१. बकरी ईदला माझ्या घरी बकर्‍यांची कत्तल केली जायची. हे मांस अनेक दिवस वाटप केले जायचे. त्या दिवसांमध्ये माझी हिंदु मैत्रीण सुशी हिचे पालक घराची दारे बंद करून ठेवायचे.

२. हिंदू श्रीकृष्ण जयंती हा सण पुष्कळ आनंदाने साजरे करायचे. सगळीकडे खाद्यपदार्थांचा सुंगध दरवळायचा. त्यामुळे मला हिंदूंच्या घरी जाण्याची इच्छा होत असे. एक दिवस मी  सुशीच्या घराच्या अंगणात गेले. तेथे पूजेच्या वेळी प्रत्येकाला गंध लावत असतांना एका महिलेने मलाही गंध लावले. माझ्या कपाळावर टिळा असल्यामुळे मी बेधडक पूजाघरात गेले आणि तेथे चांदीच्या पाळण्यामध्ये असलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती चोरली; परंतु ते सुशीच्या आजीला लक्षात आले. त्यामुळे तिने मला बाहेर काढले. (यातून हिंदूंनी त्यांच्या घरात कुणाला प्रवेश द्यावा आणि कुणाला देऊ नये, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

३. अनेक वर्षांनी जेव्हा मी अलीगड येथून आगरा येथे परतले, तेव्हा मी सुशीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी मी सुशीच्या खोलीत गेले. तिथे श्रीकृष्णाचे मंदिर होते. मी मुसलमान आहे आणि मूर्तीपूजा इस्लाममध्ये गुन्हा आहे. (असे असल्यामुळेच गेल्या एक सहस्र वर्षांपासून भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडल्या गेल्या, मंदिरे पाडली गेली आणि धर्माची वारंवार विटंबना केली गेली. हे धर्माभिमानशून्य हिंदू कधी लक्षात घेणार ? – संपादक)