पणजी – गेल्या २ आठवड्यांत गोव्यातील कोरोना संसर्गाची केंद्रे (हॉट स्पॉट) ७३ वरून ९६ झाली आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘कोरोना प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन’ या विभागाने या विषयीचा अहवाल एकत्रित केला आहे. या संसर्ग केंद्रांपैकी सर्वांत अधिक जोखमीची केंद्रे उत्तर गोव्यात बांबोळी, कालवी, थिवी, म्हापसा आणि म्हापसा औद्योगिक वसाहत ही आहेत, तर दक्षिण गोव्यात झुआरीनगर, सेम राशोल सोसो, कुडचडे, फातोर्डा आणि आकें ही आहेत.
गोव्यात दिवसभरात ९५ कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर कोरोनाविषयक ५ सहस्र १०९ चाचण्यांमध्ये ९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. हे प्रमाण १.८५ टक्के आहे. दिवसभरात ८२ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८८९ झाली आहे.