‘संगीताचा सराव करतांना मला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास होत होता. माझ्यातील अनिष्ट शक्तीला स्वरांमधील शक्ती सहन होत नव्हती. त्यामुळे सराव करतांना मला भावजागृती अनुभवता येत नव्हती आणि निराशा येत होती. त्या वेळी भगवंताने मला पुढील दृष्टीकोन दिला आणि माझ्या मनाला योग्य दिशा मिळाली.
मेघमल्हार गाऊन पाऊस पाडण्यापेक्षा ।
किंवा दीप राग गाऊन दिवे पेटवण्यापेक्षा ।
एकदा आर्ततेने ‘गुरुदेव’ म्हणण्याने ते प्रसन्न होतात ।। १ ।।
त्या करुण स्वराने ।
साक्षात् महादेवाच्याही डोळ्यांत अश्रू येतील ।
असा करुण स्वर मला हवा आहे ।
मला ज्ञान नको, तुमचे प्रेम आणि भक्ती हवी ।। २ ।।
गाण्यात परिपूर्णता असायलाच हवी. त्यातील आर्तभाव आणि भक्ती यांविना गाणे व्यर्थ आहे. स्वर हा साक्षात् ‘ॐ’कार आहे. त्याला केवळ भक्तीद्वारेच सिद्ध करता येते.’
– कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२०)
|