मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातन आश्रमातील सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा (पू. आबा) यांच्याविषयी त्यांची सून सौ. भाग्यश्री जोशी यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. ३० ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. आबांचा बालकभाव, सूक्ष्मातील जाणणे आदी माहिती वाचली. आज पुढील भाग पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/507128.html
७. भाव
७ अ. पू. आबांना जेवतांना अधिक त्रास होणे, तेव्हा ‘प्रत्येक घास परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच ग्रहण करू शकतो’, असा त्यांचा भाव असणे : ‘पू. आबा (पू. जयराम जोशीआबा) जेवतांना प्रत्येक घास ग्रहण करतांना परात्पर गुरुदेवांना नमस्कार करतात. कधी कधी ते दोन्ही हात जोडूनही नमस्कार करतात. त्यांना जेवतांना अधिक त्रास होत असतो. त्यामुळे ते सतत प्रार्थना करतात. ‘मी केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच प्रत्येक घास ग्रहण करू शकतो’, असा त्यांचा भाव असतो.
७ आ. शारीरिक त्रासामुळे अनेकवेळा लघुशंकेला जावे लागत असूनही पू. आबांनी जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांना नमस्कार करून जाणे अन् परत आल्यावरही पुन्हा डोके टेकवून नमस्कार करणे : पू. आबांना त्रासामुळे बर्याच वेळा लघुशंकेला जावे लागते. प्रत्येक वेळी जातांना ते परात्पर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांना नमस्कार करून जातात अन् परत आल्यावरही डोके टेकवून नमस्कार करतात. त्यांना चक्कर अधिक प्रमाणात येते, तरीही ते न चुकता हे सर्व करतातच. त्यांच्याप्रमाणे मी करायला लागल्यावर ‘शरणागतभाव जागृत होऊन माझा चक्कर येण्याचा त्रास अल्प होत आहे आणि मला ऊर्जा मिळत आहे’, असे जाणवू लागले. तेव्हा ‘देव मला कृतीतून शिकवत आहे’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती झाली.
८. पू. आबांमध्ये जाणवलेले पालट !
८ अ. शारीरिक पालट
१. पूर्वी त्यांना त्रास होत असतांना त्यांच्या तोंडवळ्यावर वेदना जाणवायच्या; पण आता कितीही त्रास होत असला, तरी त्यांच्या तोंडवळ्यावर तसे जाणवत नाही.
२. पू. आबांचा तोंडवळा पुष्कळ गुलाबी झाला आहे.
३. पू. आबांची नखे पिवळी झाली आहेत.
४. पू. आबांची त्वचा फारच मऊ झाली आहे आणि तिची चकाकी वाढली आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘त्यांच्यात आप आणि वायु तत्त्व वाढल्याचे हे प्रतीक आहे.’’
५. पू. आबांच्या तळव्यांना लाल आणि निळ्या रंगाची छटा आली आहे. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘ही विश्वातील सर्वांत उच्च शक्ती, म्हणजे वैश्विक ऊर्जा प्रक्षेपित होत आहे.’’
८ आ. मानसिक स्तरावरील पालट
८ आ १. बोलणे न्यून होणे
अ. पू. आबा पूर्वी साधकांशी पुष्कळ वेळ बोलायचे किंवा पुनःपुन्हा तेच तेच सांगायचे. तेव्हा ‘साधकांच्या मनावर ते ठसण्यासाठी संत परत परत सांगतात’, असे त्याचे उत्तर मला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून मिळाले होते. आता त्यांचे बोलणे न्यून झाले असून ते मोजकेच बोलतात.
आ. कुणी साधक भेटायला आले, तरी ते थोडा वेळ बोलतात. नंतर पुन्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातात. मध्येच थोडसे बोलतात. तेव्हा मी त्यांना ‘‘तुम्ही त्यांच्याशी पाहिल्यासारखे बोलत का नाही ? त्यांना नामजपादी उपाय कसे सांगणार ?’’, असे विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तू बोल. देव तुला सांगेल. काही चुकणार नाही.’’
इ. खोलीतही ते केवळ ऐकतात. त्यांचा काहीच प्रतिसाद नसतो किंवा तसे त्यांच्या तोंडवळ्यावर व्यक्तही होत नाही. कधी कधी ‘ते ऐकतात कि नाही ?’, असेही वाटते.
८ आ २. अपेक्षा उणावणे
अ. या आधी त्रास झाल्यावर ‘त्रास कधी न्यून होणार ?’, असे त्यांना वाटायचे; परंतु आता ‘ते सर्व देवावर सोडत आहेत. त्यामुळे ‘त्रास लवकर न्यून व्हावा, अशीही त्यांची अपेक्षाही राहिली नाही’, असे जाणवते.
त्यांना होणार्या त्रासाविषयी एका साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘संतांना त्रास होणारच. ते त्रास त्यांना भोगावेच लागतात. साधकांचे त्रास संतांना सहन करावेच लागतात. ते त्याला ‘नाही’ म्हणू शकत नाहीत.’’ तेव्हा ‘गुरुदेव आणि संत यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत’, याची मला जाणीव झाली.
आ. ‘आधी काही त्रास होत असतांना मी त्यांच्या समवेत खोलीत थांबावे’, असे त्यांना वाटायचे; पण आता ते प.पू. गुरुदेवांची छायाचित्रे पहाण्यात गुंग होऊन जातात. ‘त्यांचे गुरुदेवांशी सतत अनुसंधान चालू आहे’, असे जाणवते. त्यामुळे ‘मी थांबावे’, असे त्यांना वाटत नाही.
८ आ ३. इतरांचा विचार करणे : त्यांना कितीही त्रास होत असला, तरी ते त्याविषयी बोलत नाहीत. ‘रात्री किती त्रास झाला’, असे ते सकाळी उठल्यावरही सांगत नाहीत. ‘मी तुला किती त्रास देतो ?’, असे त्यांना वाटते.
८ आ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे कसलीही काळजी न वाटणे : पूर्वी घरगुती अडचणी आल्या, तर त्यांना थोडी काळजी वाटायची; पण आता वास्तू विक्रीविषयी अडचणी येत असूनही ते पुष्कळ स्थिर आहेत. ते म्हणतात, ‘‘गुरुदेव माझे सर्व व्यवस्थित करून देणार आहेत’, याची मला सहस्रो टक्क्यांनी निश्चिती आहे. मी सर्व त्यांच्यावर सोपवले आहे. मी आधी पुष्कळ कष्ट केले आहेत; पण आता गुरुदेव मला त्याचे फळ देत आहेत.’’ त्यांच्या दृढ श्रद्धेमुळे या वेळी ‘विचार न्यून होऊन शरणागती वाढली’, असे मला जाणवले.
८ आ ५. कुटुंबियांची काळजी न्यून होणे
८ आ ५ अ. सुनेचा त्रास वाढल्यावर काळजी न करता तिला नामजपादी उपाय सांगून झोपणे : पूर्वी माझा त्रास वाढल्यावर पू. आबांना काळजी वाटायची. ते रात्री जागे रहायचे. ‘तुला त्रास होत असतांना मला झोप कशी लागेल ?’, असे ते म्हणायचे. रात्री २ – ३ वेळा उठून नामजपादी उपाय सांगायचे. तेव्हा मला त्रास सहन करता येऊन थोडी झोप लागायची; पण आता ते सांगतात, ‘‘तू नामजप करत तुझा हात त्रास असणार्या ठिकाणी फिरव. त्याने तुला बरे वाटेल’’ आणि ते झोपतात. त्यांनी सांगितल्यानुसार केल्यावर खरोखरच वेदना न्यून होऊन आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊ लागतात. तेव्हा ‘ते आपल्याला घडवत आहेत आणि त्यांचा संकल्प होऊन तेच करवून घेत आहेत’, असे जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटली.
८ आ ५ आ. कु. ऐश्वर्यामध्ये (नातीमध्ये) अडकणे न्यून होणे : ‘पू. आबा आधी कुटुंबीय आणि कु. ऐश्वर्या (नात) यांच्यामध्ये अडकले आहेत’, असे जाणवायचे; पण आता ते आमच्यात अडकलेले नाहीत. ते ऐश्वर्यालाही ‘तुला आता रामनाथीला जायचे आहे. तेथे गुरुदेव तुझी सर्व काळजी घेणार आहेत. तुला माझी आठवणही येणार नाही’, असे सांगतात. आता ‘त्यातूनही देवाने त्यांना बाहेर काढले आहे. त्यामुळे ते निर्गुणाकडे चालले आहेत’, असे जाणवते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘तू त्यांची काही काळजी करू नकोस. त्यांची साधना आतून चालू आहे.’’
८ इ. आध्यात्मिक पालट : पू. आबांमधील तेज वाढले आहे. त्यांच्याकडून ‘प्रेम, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवते.
८ ई. इतर पालट : पू. आबांच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील साखळी चमकते. सर्वसाधारण व्यक्तीच्या अंगावरील दागिने काही कालावधीने जुने वाटतात; पण ‘पू. आबांचे दागिने नवीन आहेत’, असे वाटते. त्यांना वेगळ्या प्रकारची चकाकी आली आहे.
८ उ. देवघरातील पालट
८ उ १. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रातील गुलाबी छटा वाढणे : प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी पू. आबांना दिलेल्या परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रात पुष्कळच पालट झाले आहेत. छायाचित्रातील गुलाबी छटा वाढत चालली असून ‘प्रत्यक्ष गुरुदेव तिथे बसले आहेत आणि ते बोलत आहेत’, असे सर्वच साधकांना जाणवते.
८ उ २. देवघरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा वाढणे : देवघरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा वाढला आहे. आधी तिचा रंग करडा होता, तो आता निळा होत चालला आहे. मूर्तीचे (श्रीकृष्णाचे) ओठ लालसर झाले आहेत आणि मूर्तीच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा आला आहे.
९. श्रीकृष्णाची मूर्ती आणि पू. आबा यांच्या ‘ऑरा’विषयी (प्रभावळीविषयी) जाणवलेली सूत्रे !
९ अ. श्रीकृष्णाच्या मूर्तीचा ‘ऑरा’ पाहिला असता तो ३८ मीटर आणि प्रभावळ ५२ मीटर येणे : नोव्हेंबर २०२० मध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीचे ‘यु.ए.एस्.’ (युनिवर्सल ऑरा स्कॅनर) यंत्राद्वारे परीक्षण केले होते. तेव्हा त्याचा ‘ऑरा’ (प्रभावळ) जवळजवळ ३८ मीटर आला आणि मूर्तीची प्रभावळ ५२ मीटर आली. तेव्हा ‘पू. आबा किती भावपूर्ण पूजा करतात ?’, हे लक्षात येऊन माझी भावजागृती झाली. हे संशोधन करणारे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) अमित भोसले म्हणाले, ‘‘साधी पूजा केली असता ‘ऑरा’ १ ते २ मीटर येतो आणि भावपूर्ण केलेल्या पूजेचा किंवा नवरात्र इत्यादी वेळी केलेल्या पूजेचा ‘ऑरा’ ३ ते ५ मीटर पर्यंत येतो. हे फारच विलक्षण आहे.’’
९ आ. ‘पू. आबांमधील चैतन्याने केवळ मिरज आश्रमाचेच नाही, तर येथील सर्व साधकांचेच रक्षण होत आहे’, असे वाटणे : त्या वेळी पू. आबांचाही ‘ऑरा’ पाहिला. तो १७१ मीटर आला आणि प्रभावळ २२१ मीटर आली. तेव्हा त्यांच्या चैतन्याने केवळ मिरज आश्रमाचेच नव्हे, ‘साधकांचेही रक्षण होत आहे’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त झाली.
९ इ. पू. आबांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : पू. आबांनी ‘ऑरा’ काढतांना पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा घातला होता. त्या वेळी दुरून पहाणार्या एका साधकाला ‘तेथे गुरुदेवच बसले आहेत’, असे वाटले. पू. आबांकडे पहातांना बर्याच साधकांना ‘गुरुदेवांनाच भेटत आहोत’, असे जाणवून त्यांची भावजागृती होते.
१०. अनुभूती
१० अ. एका साधिकेला पू. आबांच्या खोलीत आल्यावर शिवमंदिरात आल्यासारखे जाणवणे : पू. आबा रहात असलेल्या खोलीत आल्यावर एका साधिकेला शिवाच्या मंदिरात आल्यासारखे जाणवले आणि तिला मारुतीची स्पंदनेही जाणवली. पू. आबा पुण्याला असतांना शिव आणि मारुति यांची भक्ती करायचे. त्यांचे देवळात जाणे आणि तिथे दिवा लावणे यांत कधीच खंड पडला नव्हता. ‘पू. आबा यांच्या उपासनेमुळे त्या साधिकेला ही अनुभूती आली’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.
१० आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पू. आबांना भेटण्यासाठी मिरज आश्रमात येणे : श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या अनपेक्षितपणे पू. आबांना भेटायला मिरज आश्रमात आल्या. त्या वेळी गुरुदेव आणि पू. आबा यांच्यामुळे आम्हाला त्यांचा एकत्रित लाभ झाला अन् त्या योगे ‘आपत्काळातील संकट दूर होऊन सर्वांचे रक्षण होणार आहे’, याची जाणीव होऊन फार कृतज्ञता वाटली.
१० इ. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पू. आबांना भेटण्यासाठी मिरज आश्रमात येणे : वर्ष २०२० च्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू पू. आबांना भेटायला मिरज आश्रमात आल्या. त्या वेळी ‘त्यांच्या रूपात लक्ष्मीच आली आहे आणि आपल्याला दर्शन देऊन कृतकृत्य करत आहे’, असे वाटून फार आनंद होत होता.
१० ई. पू. आबा आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पणती हातात घेऊन मिरज आश्रमातील सर्व साधकांसह छायाचित्र काढून घेणे : १३ ते १६ नोव्हेंबर २०२०, म्हणजेच धनत्रयोदशी ते भाऊबीज या कालावधीत महर्षींनी उपाय म्हणून गुरुदेवांसाठी ‘ॐ’च्या आकारात पणत्या लावायला सांगितल्या होत्या. ती सेवा करत असतांनाच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीचित्शक्ति क्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू आश्रमात आल्या. त्यांनी एक पणती पू. आबांच्या आणि एक स्वतःच्या हातात घेऊन मिरज आश्रमातील सर्व साधकांच्या समवेत छायाचित्रे काढून घेतली. त्या वेळी ‘गुरुदेवांमुळे आम्हाला या आनंदाचा लाभ मिळत आहे’, याची जाणीव होऊन फार कृतज्ञता वाटत होती. त्या वेळी पणत्यांमधून बाहेर पडणारा पिवळसर प्रकाश सर्व आसमंतात पसरला असून ‘आम्ही वेगळ्याच लोकांत आहोत’, असे जाणवत होते. तेव्हा ‘गुरुदेवांनी हा ज्ञानाचा प्रकाश उधळला आहे’, असे जाणवले.
१० उ. पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींनी पू. आबांचे ‘भाऊ’ म्हणून औक्षण केल्यावर ‘संतकुळाशी आपण जोडले गेलो’, या जाणिवेने पुष्कळ कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : दिवाळीला पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींनी पू. आबांचे ‘भाऊ’ म्हणून औक्षण केले. ‘हा सोहळा देवलोकातच चालू आहे’, असे आम्हाला वाटत होते. या प्रसंगी पू. आजींचा ‘पू. आबा कृष्णच आहेत’, असा भाव होता. त्या वेळी सर्वत्र पांढरा प्रकाश पसरला होता आणि भावजागृती होत होती. औक्षण झाल्यावर ओवाळणीच्या तबकातील कुंकवामध्ये ‘ॐ’ उमटला. त्या वेळी पू. आजींनी आम्हाला सांगितले, ‘‘आता मी तुमची आत्या झाले आहे आणि पू. आबा हे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मामा झाले आहेत.’’ हे ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले. ‘देवाने पू. आबांच्या माध्यमातून आम्हाला संतांच्या कुळाशी जोडले आणि आम्हाला संत आत्या अन् काका दिले’, याची जाणीव होऊन भावजागृती झाली.
११. पू. आबांना ऐहिक गोष्टींचे विस्मरण होणे; मात्र साधक आणि त्यांची नावे न विसरणे
पू. आबांना सध्या फार विस्मरण होऊ लागले आहे. त्यांना दिवस किंवा वेळही समजत नाही. ‘सकाळ आहे कि सायंकाळ ?’, हेही समजत नाही. ते आता स्थळकाळाच्या पुढे चालले आहेत; पण त्यांना वेळ किंवा जेवण यांची आठवण नसली, तरी साधकांची आठवण आणि त्यांची नावे लक्षात असतात. तेव्हा ‘साधक जसे परात्पर गुरुदेवांचे प्राण आहेत, तसे संतांचेही प्राण आहेत. ते इतर सर्व विसरले, तरी त्यांच्या साधकांना विसरू शकत नाहीत’, याची जाणीव झाली.
१२. प्रार्थना
‘गुरुदेवा, पू. आबांच्या रूपात तुमचाच सहवास आम्हाला लाभला ! आपणच आमच्याकडून पू. आबांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घ्या. आमच्यामध्ये त्यांच्यासारखा भोळा भाव वाढू दे. ‘आम्हा सर्वांचे आधारस्तंभ असलेल्या पू. आबांना सद्गुरुपदी विराजमान करावे’, अशी आपल्या चरणी आर्त प्रार्थना !’
– सौ भाग्यश्री योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज. (११.३.२०२१)
|