लवकरी दर्शन दे माधवा ।

आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…

श्री. सुधाकर जोशी

कृष्णा,
तुजसाठी आले वना ।
तव मुरलीचा नाद ऐकता ।।
पाणी भरण्या यमुनातिरा ।
करुणाकरा,
तुजसाठी आले वना ।। १ ।।

बासरीचे सूर ऐकता ।
आस लागली या वेडीला ।।
लवकरी ये माधवा । तुजसाठी आले वना ।। २ ।।

सासू माझी द्वाड भारी । जाऊ दे रे आता श्रीहरि ।।
दर्शन दे श्रीधरा । तुजसाठी आले वना ।। ३ ।।

वेड लागले या राधेला । कधी येशील रे दही-दूध खाण्या ।।
कधी दर्शन देशील माधवा । तुजसाठी आले वना ।। ४ ।।

कृष्णा, कृष्णा, कृष्णा…!

– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.६.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक