‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे ! – तालिबानची चेतावणी

तालिबानने अशी चेतावणी देणे याचाच अर्थ तालिबान पाकला साहाय्य करत आहे आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने पाकच्या विरोधात कोणत्याही कारवाया करू नयेत, असाच आहे ! – संपादक

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद

काबुल (अफगाणिस्तान) – ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (पाकमधील आतंकवादी संघटना) जर आम्हाला (अफगाणिस्तानमधील तालिबानला) नेता मानत असेल, तर आमचे म्हणणे त्यांनी ऐकले पाहिजे; मग ते योग्य असो कि नसो, अशी चेतावणी तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेला दिली आहे. ‘जियो न्यूज’ या वृत्तवाहिनीला मुजाहिद याने मुलाखत देतांना ही चेतावणी दिली. जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले की, अफगाणिस्तानला नाही, तर पाकलाच ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेशी लढले पाहिजे. हे पाक आणि तेथील उलेमा यांच्यावर अवलंबून आहे, तालिबानवर नाही.