धर्मसत्तेच्या स्थापनेसाठी देशातील साधू आणि संत संघटित होत आहेत ! – माजी आय.पी.एस्. अधिकरी डी.जी. वंजारा

माजी आय.पी.एस्. अधिकरी डी.जी. वंजारा

द्वारका (गुजरात) – धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित चालत असतात. स्वातंत्र्यानंतर राजसत्तेची स्थापना झाली; मात्र धर्मसत्तेची स्थापना होऊ शकली नाही. आता त्याच धर्मसत्तेच्या स्थापनेसाठी देशातील साधू आणि संत संघटित होत आहेत, असे प्रतिपादन गुजरातचे माजी आय.पी.एस्. अधिकारी डी.जी. वंजारा यांनी येथे आयोजित हिंदु धर्मसभेमध्ये बोलतांना केले. सनातन सेवा मंडळाच्या माध्यमातून वंजारा यांनीच ही सभा आयोजित केली होती. वंजारा सातत्याने गुजरातमधील साधू आणि संत यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

डी.जी. वंजारा त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, गुजरात, तसेच संपूर्ण देशामध्ये धर्मसत्तेची स्थापना झाली पाहिजे. राजसत्तेसमवेत धर्मसत्ता असण्याची राष्ट्रीय परंपरा राहिली आहे. गेल्या वर्षभरापासून देशात धर्मसत्तेची स्थापना करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. धर्मसत्तेची स्थापना झाली, तर हा देश, तसेच हिंदू आणि अन्य धर्मीय त्यांच्या समस्यांतून मुक्त होतील.