एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘२०.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये रामनाथी (गोवा) येथील सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त साधकांनी केलेल्या कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या वाचून डिचोली (गोवा) येथील साधिका सौ. सुजाता कानोळकर यांनी ओळख नसतांनाही सौ. वर्धिनी यांच्यासाठी जाईच्या फुलांचा सुंदर गजरा केला आणि तो त्यांना देण्यासाठी रामनाथी आश्रमात पाठवला. यातून साधकांमध्ये एकमेकांविषयी असलेल्या प्रीतीचा एक वेगळा पैलू मला अनुभवता आला.
या प्रसंगावरून ‘माध्यम कुठलेही असले, तरी ‘एकमेकांना आनंद कसा द्यायचा ?’, हे गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकांना शिकवले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
मला हा अनुभव दिल्याबद्दल मी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. सानिका जोशी (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२१)