रत्नागिरी येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर हिने ‘कोरोना’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नामजप केल्यावर प्रथम झोप येणे अन् झोपायला गेल्यावर मुखाने आपोआप नामजप चालू राहून आनंदाची अनुभूती येणे

कु. अपाला औन्धकर

२७..२०२० च्या रात्री १०.३० वाजता मी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘कोरोना’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सांगितलेला ‘श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव’ यांचा नामजप करत होते. मी ६० वेळा नामजप केल्यावर मला झोप येऊ लागली आणि झोपायला उशीर झाला होता; म्हणून मी झोपण्याची सिद्धता केली. झोपण्याआधी दैनिक ‘सनातन प्रभात’ची इंटरनेटवरील ‘पीडीएफ्’ भ्रमणभाषवर वाचण्यासाठी आरंभ केला; पण मला वाचताच येत नव्हते. माझ्या मुखाने नामजपच चालू होता. तेव्हा मला आईसमवेतही नेहमीसारखे बोलता येत नव्हते. माझ्या मुखातून केवळ नामजपच चालू होता. मी म्हणाले, ‘‘आई, अगंऽ ! हे काय होत आहे, ते मला कळत नाही.’’ हे वाक्य बोलतांनाही ‘मी नामजप करत आहे आणि माझ्या जिभेवर काहीतरी जडपणा जाणवत आहे’, असे मला वाटले. त्या स्थितीत माझी भावजागृती होत होती आणि मला आनंद जाणवत होता. बराच वेळ मला झोप येत नव्हती आणि माझ्या मुखातून आपोआप नामजपच चालू होता. नंतर ‘कधी झोप लागली ?’, हे मला कळले नाही. ही अनुभूती दिल्याने मी गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – कु. अपाला अमित औंधकर (वय १४ वर्षे), रत्नागिरी (२७..२०२०

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक